कोकणदिवा (Kokandiva) किल्ल्याची ऊंची :  900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
सह्याद्रीमध्ये आपल्याला नानाविध प्रकारच्या पर्वतरांगा बघायला मिळतात, पण त्यात सरस ठरतो तो रायगड. रायगडाला चोहोबाजूंनी पर्वतरंगांचे अभेद्य संरक्षण लाभले आहे आणि म्हणूनच तो लांबून लगेच दृष्टीस पडत नाही. कोकणदिवा हा रायगडाच्या उत्तर दिशेला असून त्याचा मुख्यत: वापर हा रायगड आणि कावळे घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी करण्यात येत असावा असा निष्कर्ष काढता येतो.

विशेष सूचना:
१. गुहेच्या पुढे गडमाथ्यावर जाणारा मार्ग पावसाळ्यात निसरडा होत असल्याने काळजी घेणे महत्वाचे आहे.
२. गारजाईवाडी मधील पाणी चांगले नसल्यामुळे सोबत भरपूर पाणी बाळगावे.
इतिहास :
गडमाथ्या अगोदर आपल्याला कातळटप्पा लागतो. या कातळटप्प्याच्या खाली पश्चिमेकडे (डावीकडे) एक गुहा आहे. गुहे समोरच ४ पाण्याची टाकी आहेत. यापैकी गुहेजवळील १ टाके स्वच्छ असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी टाके पूर्ण उघडे नसून त्यातून पाणी काढायला २ फूट व्यासाचे दगडात भोक ठेवलेले पाहायला मिळते. पाण्यात कचरा पडू नये व कमीत कमी पाण्याची वाफ व्हावी यासाठी टाक्याची अशी रचना केली जाते. उर्वरीत ३ टाक्यां पर्यंत जाणे कठीण आहे. गुहेच्या पाहून परत मुळ वाटेला लागून १० फूटाचा कातळटप्पा चढून गेल्यावर, थोडीशी घसार्‍याची वाट (स्क्री) लागते. ती पार केल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो.( पावसाळ्यात हा कातळ टप्पा चढण्यासाठी दोर लागू शकतो.) गडमाथ्यावरून दक्षिणेकडे किल्ले रायगड आणि पूर्वेला किल्ले तोरणा आग्नेयेला लिंगाणा व पश्चिमेला कावळ्या घाट ह्यांचे सुरेख दर्शन होते.
गडावरून खाली उतरताना सरळ खाली येणारी वाट गारजाईवाडी जाते. तर नळीच्या मार्गाने डावीकडे गेल्यास कावळे घाट मार्गे सांदोशीत उतरता येते.
पहाण्याची ठिकाणे :

पोहोचण्याच्या वाटा :
कोकणदिवाला दोन मार्गांनी पोहोचता येते :
१. गारजाईवाडी मार्गे आणि २. सांदोशी गावातून कावळे घाटमार्गे

१. गारजाईवाडी मार्गे :- गारजाईवाडी कडून जाणारी वाट सोपी आहे. गारजाई वाडीला पोहोचण्यासाठी पुणे - पानशेत - दापसर - घोळ (अंतर ७५ किमी) मार्गे आधी घोळ गाव गाठावे. घोळ येथे पोहोचून उजवीकडे (पूर्वेकडे) जाणार्‍या लालमातीच्या वाटेने साधारणत: २ ते ३ कि. मी. (१ तास) चालल्यावर आपण गारजाईवाडी मध्ये पोहोचतो. गारजाईवाडी गाव डावीकडे ठेवून (येथे पुढे एक वाट डावीकडे गावात शिरते,) ती सोडून आपण उजवीकडे जायला चालू करायचे. हीच वाट पुढे थोडी खाली उतरते आणि झाडीत शिरते. साधारण १० मिनिटे चालल्यावर डावीकडे वळणारी (पूर्वेकडे) एक वाट पुढे उघड्या रानमाळावर आणून सोडते. येथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेल्या कोकणदिवाचे प्रथम दर्शन होते. पुढे उघडा रानमाळ असून मधे नळीची वाट दिसते. ती पार केल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. पुढील चढाई दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी आहे. वाटेत बरीच झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. सरळ जाणारी ही पायवाट साधारण अर्ध्यातासाच्या चढाईनंतर गडमाथ्याजवळील गुहेजवळ आणून सोडते.

२. सांदोशी गावातून कावळे घाटमार्गे :- मुंबई - पनवेल मार्गे महाड गाठावे. महाड - पाचाड - सांदोशी अंतर ३२ किमी आहे. या मार्गावर ६ आसनी रिक्षा व एसटी बसेस आहेत. सांदोशी ते कावळ्या घाटमार्गे २ तास चढाई केल्यावर आपण किल्ल्याच्या गारजाईवाडी कडून येणार्‍या वाटेला मिळतो. (या वाटेने जाण्याकरीता गावातून गाईड घेतल्यास उत्तम, चुकण्याची शक्यता जास्त आहे.) या ठिकाणाहून १ तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
राहाण्याची सोय :
गडावरील गुहेत ७-८ जणांना राहत येऊ शकते.
गारजाईवाडीतील देवीच्या मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गुहेबाहेरील पिण्याच्या पाण्याचे टाके स्वछ असून पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गारजाईवाडीतून गडावर जाण्यास २ तास लागतात. सांदोशीतून गडावर जाण्यास ३ तास लागतात.

PHOTOS

image
image
image
image
image
image
image
image

MAPS

map

YOUTUBE VIDEO

Subscribe